नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिवस त्यानिमित्ताने सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मी इथे दोन प्रकारचे लोक पाहत आलोय एक म्हणजे नेहमी मराठीसाठी आग्रही असणारे आणि दुसरे म्हणजे फक्त भाषा दिनादिवशी मराठी प्रेम दाखवणारे. हल्ली सोशल मीडियावर आपल्याला असे बरेच नमुने पाहायला मिळतील जे इतर दिवशी इतर भाषेत बोलणं , व्हाट्सअप्प , फेसबुक , इंस्टाग्राम वर इतर भाषेत मेसेज सामायिक करत असतात. परंतु अश्या लोकांना या गोष्टीची जाणीव नसते की ते स्वत:च्या भाषेला डावलून इतर भाषेचा प्रचार प्रसार करत आहेत. फक्त मराठी भाषा दिना दिवशी शुभेच्छा देऊन मराठी मोठी होत नसते याची जाण झाली पाहिजे. सोशल मीडियावर एकाच दिवसाच गर्व असण गरजेचं नाही. एका दिवसाने गाजावाजा करून काय होणार ? एकीकडे उत्साहात मराठी भाषा दिवस साजरा करतायचा अमुक तमुक स्टेट्स मेसेज फोरवर्ड करायचे आणि दुसरीकडे इतर भाषेत व्यक्त व्हायच मेसेज पाठवायचे अश्याने मराठी वाढेल? मराठीचा नुसता गर्व असून काय उपयोग? इतर वेळी प्रामुख्याने मुंबई , पुणे सारख्या शहरात अनोळखी किवा ओळखीच्या व्यक्तीशी बोलताना कळत नकळत परभाषेत व्यक्त होतो आणि इथेच आपण आपल्या मायबोलीला दुय्यम स्थान देतो. शुभेर्छा देतानाही परभाषेत देतो तेव्हा कुठे जातो आपला मराठी बाणा की फक्त २७ फेब्रुवारी आणि १ मे या दोन दिवशीच मराठी बाणा अंगात येतो?
आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो जिथे जिथे जातो तिथे आपण मराठीचा वापर कमी करतो किवा रस्त्यावर लागलेल्या जाहिराती , दुकानाचे फलक मराठीत आहेत का आणि तिथे मराठी नसेल तर तर त्यासाठी मागणी करत नाही. उलट त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कामाच्या निमित्ताने ओळख झालेले इतरभाषिक मित्रांजवळ आपण मराठीत न बोलता हिंदीत संवाद साधतो. पण त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. कोणत्याही दुकानात किवा सरकारी कार्यालयात गेल्यावर आपण सुरवातच इतर भाषेतून करतो. मग ती समोरची व्यक्ती मराठी असली तरीही. कारण आपल्याला आपल्या भाषेच महत्व कळालेलच नाही. आपण फक्त मराठी भाषेला आपली घरची भाषा करून ठेवलीय. जोपर्यंत ती आपण आपल्या व्यवहारत वापरत नाही तोपर्यन्त ती पसरणार नाही हे आपल्या लक्षात आले पाहिजे.
आता प्रतेकजण म्हणू शकतो की मी एकटा काय करू करू शकतो सगळेच तर अस करतात. पण आपण इतकही करु शकतो की आपण जिथे जिथे जातो तिथे आपल्याना मराठी डावळलेली दिसली तर आपण तिथे मराठीची रीतसर मागणी करू शकतो. त्यांची चुक त्यांना दाखऊन देऊ शकतो तिथे आपण बदल घडऊन आणू शकतो. रस्ते, मॉल इतर ठिकाणी लागणार्या जाहिराती मराठीत नसल्या तर आपण त्या त्या कंपनीला सोशल मिडियाद्वारे एक मेसेज एक मेल किवा ट्वीट याद्वारे आपण आपली तक्रार करू शकतो. आपल्याला येणारे कॉल्स मग ते कोणत्या इन्शुरेंस कंपनीचे, बँकांचे असो अथवा इतर कोणत्याही येणार्या कॉल्स वर आपण मराठीतच बोलल पाहिजे बोलताना सुरवात आणि शेवट हा मराठीतुनच झाला पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या मराठीचा प्रचार,प्रसार होऊ शकतो अश्या गोष्टी आपण सहज करू शकतो. फक्त मराठी भाषा दिवशीच मराठी मराठी करून एक दिवस प्रेम दाखऊन मराठीचा प्रचार प्रसार होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात आले पाहिजे.
- मंगेश काजवे